कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, महाराष्ट्र समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग, श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुर्नवसन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रित्विक ग्रुपने कणकवली बस स्थानक येथे अंधश्रद्धा निर्मूलनबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.
पथनाट्यात कलाकार रितेश जाधव, अमित जाधव, तुषार जाधव, सोनाली नारकर आदींनी पथनाट्यातून अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती केली. नरबळी, अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध व उच्चाटन करण्यासाठी काय काय करावे, याबाबतची माहिती दिली. यावेळी बार्टीचे समतादूत अॅड. सुदीप कांबळे, संग्राम कासले, विजय कदम आदी उपस्थित होते.
कणकवलीत पथनाट्यातून अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जागृती









