भोसले नॉलेज सिटी ; गौरवशाली वाटचालीची तपपूर्ती

धार्मिक कार्यक्रमांनी १२ व्या वर्धापनदिनाला दमदार सुरुवात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या क्षेत्रात नावाजलेल्या भोसले नॉलेज सिटीच्या १२ व्या वर्धापन दिनाची सुरुवात शनिवारी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधत श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेचे यजमानपद संस्थेच्या सदस्या आस्था सावंत-भोसले यांनी स्वीकारले. वेदमंत्रांच्या घोषात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पूजा संपन्न झाली. यानंतर आरती व स्तोत्रगायन करण्यात आले. उपस्थितांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सावंत भोसले, अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सीईओ लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा तसेच सर्व प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या बारा वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि समाजाभिमुख कार्याच्या बळावर भोसले नॉलेज सिटीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित विविध उपक्रमांना भक्तिमय आणि मंगलमय प्रारंभ झाला असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!