पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या पाठपुराव्याला यश; भाजप पदाधिकारी यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून पासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे नागरिक, प्रवासी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच वैभववाडी पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, भाजप मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे तसेच तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. सिंधुदूर्ग जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनीही या विषयावर लक्ष घालून पालकमंत्र्यांकडे विनंती केली होती. या सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामास सुरुवात झाली असून तालुक्यात पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.












