सावंतवाडी (प्रतिनिधी) : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा 2026 च्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अँड. संग्राम देसाई भरघोस मतांनी निवडून आले असून त्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक, पदाधिकारी व सर्व जिल्हा संघटनेच्या सदस्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र व गोवा राज्यात सर्वात लहान जिल्हा व वकील सदस्य संख्या किमान असूनही एकूण 25 सदस्यांपैकी सहाव्या क्रमांकाने निवडून येणे ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानत असून हा जिल्ह्याच्या एकजुटीचा विजय असून अँड. असीम सरोदे यांच्या सारख्या प्रवृत्तीला चपराक आहे. अँड. संग्राम देसाई यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाची पोचपावती असल्याचे मत अॅड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले. खंडपीठ, विविध न्यायालय निर्मिती, ऍडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर व वकील वर्गासाठी घेतलेल्या हितवर्धक निर्णयांमुळे हा विजय प्राप्त झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ वकील अॅड. उमेश सावंत यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यातून दुसऱ्यांदा निवडून आलेले अॅड संग्राम देसाई यांचा विजय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि कोकणच्या दृष्टीने गौरवास्पद आहे असे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणूकित ऍड संग्राम देसांईचा सलग दुसरा विजय












