खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र देवगड, पुरळ गावचे मूळ रहिवासी लेणी संवर्धक, प्रचारक व अभ्यासक यांना तेजस सेवा प्रतिष्ठान संगमनेर जि. अहिल्यानगर या संस्थेच्या वतीने भरतोय संविधान दिनाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमृत महोत्सवी वर्षात देण्यात येणारा महाराष्ट्र रत्न पुरस्कार -२०२६ नुकताच महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष डाँ रविंद्र घोसाळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर येथील मालपाणी लॉन्स हॉल येथे प्रदान करण्यात आला. आपल्या भारताच्या संविधान अमलबजावणीला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्यामध्ये विशेष कार्य करणा~या ७५ भीमरत्नांना ” राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२६ ” प्रदान करण्याचे प्रयोजन डाँ रविंद्र घोसाळे सरांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले होते. या ७५ भीमरत्नामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र प्रफुल्ल वैशाली विश्वनाथ पुरळकर यांची “लेणी अभ्यासक / प्रचारक” म्हणुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड करण्यात आली होती. प्रफुल्ल पुरळकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पुरळ ह्या गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या कार्याची दखल तेजस सेवा प्रतिष्ठान संगमनेर जि. अहिल्यानगर या संस्थेने घेऊन त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. आदरणीय अँड संघराजजी दादासाहेब रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मुख वक्ते म्हणून प्रा मुकुंद भारसाकळे, आदरणीय भन्ते के सुमेध बोधी, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अकोले चे आमदार डॉ. किरण लहामटे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२६ प्राप्तीमुळे मला माझ्या लेणी अभ्यास प्रचार कार्याला महत्वपुर्ण उर्जा मिळालेली असून याचे श्रेय एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह, महाराष्ट्र राज्य या संगठनेला मी देत असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रफुल पूरळकर यांनी दिली.”

संगमनेर अहिल्यानगर येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र प्रफुल्ल पूरळकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करताना डॉ. रवींद्र घोसाळे, भंते के सुमेध बोधी, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे आदी उपस्थित होते.












