कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी ५ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सकारात्मक पावले उचलण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.पर्यावरण रक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे.पर्यावरणाचा समतोल टिकून ठेवणे हे मानवाच्या हातात आहे.त्यासाठी झाडे लावा व झाडे जगवा आणि त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. याच उदात्त हेतूने कनेडी प्रशालेत दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो.

यावेळी शालेय समितीचे चेअरमन आर.एच. सावंत, सदस्य संतोष सावंत यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!