मराठे कृषी महाविद्यालयाच्या वतीने तळेरे येथे शेतकऱ्यांना माती परीक्षणाबाबत मार्गदर्शन

तळेरे (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषि विदयार्थी ग्रामीण कृषी जागरु‌कता व कृषी औदयोगिता कार्यक्रम अंतर्गत तळेरे येथे शेतकऱ्यांना माती परिक्षण प्रात्यक्षिकाचे मागर्दशन करण्यात आले.

वर्षातून दोन ते तीन वेळा पीके घेतल्यास मातीचा नमूना दरवर्षी घेणे जरुरीचे असते. नत्र या अन्नद्रव्याचे जमिनीतील प्रमाण दरवर्षाला बदल असल्याने त्याचे प्रमाण तपासण्यासाठी मातीचा नमुना दरवर्षी घेणे आवश्यक असते. यासाठी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तळेरे गावातील शेतकऱ्यांना माती परिक्षण प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले तसेच माती परिक्षणासाठी लागणाऱ्या मातीचा नमुना कसा घ्यायचा व घेतलेली माती परिक्षणासाठी जवळच्या कृषी विज्ञान केंद्रात कशी दयायची याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिकासाठी तळेरे गावातील शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात प्रतिसाद दिला. कै. राजाराम मराठे कृषी महाविदयालय फोंडाघाटचे प्राचार्य श्री. संते सर कार्यक्रम समन्वयक श्री. बगाडे, विषय शिक्षिका दर्शना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यालयाचे विद्यार्थी अरिहंत अंकलखोपे, संग्राम पाटील, रोहित देशपांडे, शर्विल पाटील, आदर्श कोरे, प्रतिक मोरस्कर, हर्षय पालये, तन्मय पालये, हिमांशु राणे, ओंकार सुतार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!