महेश वाघमारेच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते अचित कदम यांची धाव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील महेश वाघमारे उर्फ पडी याच्या आर्थिक मदतीसाठी वरवडे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अचित कदम यांनी धाव घेत पडी याला आर्थिक मदत केली. यावेळी सोहेल खान उपस्थित होते.महेश उर्फ पडी याच्या पायाला झालेल्या गंभीर जखमेवर सध्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पायाला झालेली जखम हाडांपर्यत झाली आहे किंवा कसे यासाठी आवश्यक अत्याधुनिक तपासणी सुविधा उपजिल्हा रुग्णालयात नाही आहे. त्यामुळे महेश ची तपासणी खाजगी रुग्णालयात करावी लागली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अचित कदम यांनी तात्काळ महेश वाघमारे याच्याकडे आर्थिक मदत सुपूर्त केली.

error: Content is protected !!