पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांचा सेवाभावी उपक्रम

दिविजा वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना वॉकिंग स्टिक व अन्नधान्य वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) : “प्रत्येक वृद्धाला हवा कुटुंबाचा आधार, हेच आपले कर्तव्य आणि अधिकार… एक हात मदतीचा” या भावनेतून मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीचे माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी उपक्रम राबविला.

माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी सहपत्नी ॲड.भाविका संताजी रावराणे यांच्यासमवेत नांदगाव (असलदे) येथील दिविजा वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांचे आशीर्वाद घेतले. यावेळी वृद्धांच्या दैनंदिन जीवनात आधार ठरतील अशा वॉकिंग स्टिकचे वाटप करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमासाठी जीवनावश्यक मोफत अन्नधान्याचे वितरण करून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.पालकमंत्री नितेश राणे यांचे निस्सीम चाहते म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक संताजी रावराणे हे गेल्या दहा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.

या प्रसंगी माजी नगरसेवक संताजी रावराणे,ॲड.भाविका संताजी रावराणे, स्वस्तिक फाऊंडेशनचे सचिव संदेश शेट्ये तसेच वृद्धाश्रमातील कर्मचारी व स्टाफ उपस्थित होते. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

error: Content is protected !!