आठ शाळांतील ५०० विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य वाटप
सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांचा उपक्रम
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांच्या सौज्यन्याने एकूण १०० ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले. तसेच खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघातील आठ शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
जेष्ठ नागरिक सेवा संघ खारेपाटण या संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मोफत छत्री वाटप कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव,माजी जि.प.सदस्य तथा बांधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,भाजप महिला कार्यकर्त्या उज्ज्वला चिके,विजय देसाई,खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे,ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,महेश कोळसुलकर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष कुबल गुरुजी,खजिनदार सुरेश गोडवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना रवींद्र जठार व सतीश गुरव यांच्या शुभहस्ते पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले.
“खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी येथील ज्येष्ठ नागरिकांची गरज ओळखून त्यांना दिलेल्या छत्र्या ह्या या पावसाळ्यात आधार देतील.व राणे साहेबांच्या आदेश प्रमाणे त्यांचा वाढदिवस हा साधेपणाने व समाजोपयोगी असणारा असा साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्याचे अनुकरण करून सतीश गुरव व भाजप पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या सर्व जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद यानिमित्ताने राणे साहेबाना मिळणार असल्याचे भावपूर्ण उदगार यावेळी रवींद्र जठार यांनी या कार्यक्रमात बोलताना काढले.”
यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनेच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांचे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुबल गुरुजी यांनी केले तर या कार्यक्रमाला खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.












