पालकमंत्री नितेश राणेंचे भाजपा जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने वाढदिवशी अभिष्टचिंतन

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने नितेश राणे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. राज्याच्या विकासासाठी तसेच युवकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विविध विकासकामांना गती मिळत असून युवकांमध्येही त्यांच्याबद्दल विशेष आकर्षण असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त आयोजित या सदिच्छा भेटीत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेतील अधिक यशासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी युवा मोर्चाचे सरचिटणीस संतोष पुजारे, मंडल अध्यक्ष अण्णा खाडये, शहराध्यक्ष सागर राणे तसेच प्रीतम पाताडे उपस्थित होते.

error: Content is protected !!