नगरसेविका संध्या तेर्से यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

कुडाळ नगरपंचायतमध्ये खळबळ

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ नगरपंचायतीतील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी तडकाफडकी नाईलाजाने नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याजवळ दिला आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. याबाबत नगरसेविका संध्या तेरसे नेमक कश्यासाठी राजीनामा दिलाय ते त्यांनी आपल्या पत्रात सांगितले आहे.

मी संध्या प्रसाद तेरेसे, नगरसेविका कुडाळ यापूर्वी आपणांस दि. 2/7/2026 रोजी कुडाळ मुख्याधिकारी यांच्या गैरकारभरावर कारवाईच्या मागणीच पत्र स्वतः भेटून दिले, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने 10 जुलै रोजी 9 ते 6 या वेळात उपोषण केले, त्यालाही आपल्याकडून उत्तर नाही मिळाले, 10 जुलै रोजी नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या गैर कारभाराबाबत कारवाई करण्याच्या हमीचे मागणीचे पत्र ज्यावर कुडाळ शहरातील 100 लोकांच्या सह्या होत्या त्यालाही आपले उत्तर नाही. त्यानंतर 13 जुलै रोजी पुन्हा भेटून कारवाईची विनंती केली तरीही काही कारवाई केल्याचे मला अवगत नाही. त्याच प्रमाणे ज्या विशेष सभेत विषय पत्रिकेवर असलेल्या विषयाचा ठराव मांडण्याची आणि एक मत होतं नसल्यास मतदानाची मागणी करूनही सभाध्यक्ष ठरावच घेत नाहीत. मुख्याधिकारी सांगतात ठराव मतदाणासाठी घ्यावा किंवा नाही हा अधिकार फक्त सभा अध्यक्षांचा आहे मग सभेत नगरसेवक कशाला हवेत. कुडाळ शहरातील एका मध्यवर्ती भागातील जमीनीबाबत मुख्याधिकारी यांनी सभेपुढे विषय चर्चेला न ठेवता परस्पर ना हरकत दाखला दिला आणि त्या मुख्याधिकारी यांची चूक दाखवून देणाऱ्या नगरसेविकेच्या विरोधात नगराध्यक्ष आणि काही नगरसेवक भर सभेत प्रशासनाची बाजू घेत नगरपंचायतच्या मालकीच्या जमिनी बाबत दाद मागण्यासाठी साधा ठराव देत नाही या मगच गणित कोणालाही कळेल. प्रशासनाच्या जागा ताब्यात असणे आणि मालकी असणे यातील फरक जर नगरसेवकांना समजत नसेल किंवा जाणूनबुजून समजून घ्यायचा नसेल तर त्यावर कायचं बोलणार?

नगरपंच्यायात प्रशासनाच्या चुकीची दाद जिल्हा प्रशासन प्रमुख मा. जिल्हाधिकारी म्हणून आपल्याकडे मागितली तरीसुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही नाही. जिल्हाधिकारी यांनी अहवाल मागून सुद्धा 7 दिवस मुख्याधिकारी अहवाल देत नाहीत मग मुख्याधिकारी नक्की कोणाच्या छत्रछायेत एवढी मुजोरी दाखवतात? काल मुख्याधिकारी यांनी प्रसार माध्यमांना खुलासा दिला मग यापूर्वीच जेव्हा नाहरकत दाखला दिला तो रद्द समजावा असे पत्र भूमी अभिलेख कुडाळ उप अधीक्षक यांना का दिले? मी मुख्याधिकारी यांची शुक्रवार 19 जून रोजी भेट घेतली असता लगेच 22 जून रोजी संबंधित जागेचा खरेदी व्यवहार रजिस्ट्री कशी होते? नगरपंचायत आणि दुय्यम निबंधक सिंधुदुर्ग यांचा पत्राव्यावहार आवक जावक एका दिवसात कसा होतो?

या दाव्याबाबत पुढील कारवाई साठी अमोल मालवणकर एडव्होकेट यांची तातडीने नेमणूक करूनही त्यांनी याबाबत चे दि. 3 जुलै रोजी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अपेक्षित ठराव तातडीने मिळावा असे पत्र असताना सुद्धा लगतच असलेल्या विशेष सभेत सदर महत्वाचा विषय ठेवणे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना आवश्यक वाटले नाही, म्हणून मी याबाबत मा. जिल्हाधिकारी आपणाकडे लेखी पत्रद्वारे दाद मागितली तरीसुद्धा याबाबत कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ज्या सभागृहात नगरपंच्यायात च्या मालकीची जागा वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ठराव मांडणी करायलाच देत नाही, स्वतः ची मनमानी करत नगरसेवक म्हणून अधिकार डावलतात त्या सभागृहात बसणे म्हणजे सुरु असलेल्या मनमानी कारभाराला साथ दिल्यासारखेच असेल. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत प्रसासान / मुख्याधिकारी यांच्याकडून होत असलेला गैरकारभार व त्याला नगराध्यक्ष व काही नगरसेवक यांची साथ यामुळे मी संध्या प्रसाद तेरेसे नगरसेविका प्रभाग 12 हिंदु कॉलनी कुडाळ माझ्या पदाचा आज रोजी अतिशय खेदाने राजीनामा देत आहे. मी प्रशासनाच्या प्रमुखांकडून एखाद्या योग्य आणि सत्य समाजहीताच्या गोष्टीसाठी कायद्याला नियमांना धरून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करूनही न्याय नाहीच मिळाला पण साथी दखल सुद्धा घेतली गेली नसल्याने मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्त करत आहे, तो मंजूर व्हावा असे त्यांनी आपल्या पात्रात म्हटले आहे.

error: Content is protected !!