वैभववाडी येथे ४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय खुल्या समरगित गायन स्पर्धचे आयोजन

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंत नावनोंदणी करण्याचे आयोजकांनी केले आवाहन

वैभववाडी (प्रतिनिधी) : हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दि ०४ ऑगस्ट २०२६. रोजी आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे जिल्हास्तरीय खुल्या समरगित गायन स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १२,०००/- व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक १०,०००/- व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक ७,०००/- व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ पारितोषिके देखील ठेवण्यात आले आहे. दि.३१ जुलै २०२६ पर्यंत संघांनी आपली नावनोंदणी करायची आहे.

अधिकृत नियमावली
1.गायन देशभक्ती, शूरवीरांचे बलिदान, भारत माता, सैनिकांचे जीवन, किंवा राष्ट्रप्रेम या संकल्पनेवर आधारित असावे.

  1. स्पर्धा खुल्या गटामध्ये होईल.
    3.प्रत्येक गटाला गाण्यासाठी किमान 5 मिनिटे ते कमाल 7 मिनिटांचा वेळ दिला जाईल. वेळेचे उल्लंघन केल्यास गुण कपात केले जातील.
  2. गुणदान हे सुर-ताल, उच्चार, भाव आणि सादरीकरणावर आधारित असेल.
  3. गित मराठी किंवा हिंदी भाषेत असणे आवश्यक आहे.
  4. स्पर्धकांनी स्पर्धेच्या निश्चित वेळेच्या 30 मिनिटे आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  5. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि तो सर्वांसाठी बंधनकारक असेल.
    अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क – निलेश कारेकर 77210 59584. मंदार चोरगे 9767222248. यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन
    आयोजक विजय रावराणे व मित्र मंडळ यांनी केले आहे.
error: Content is protected !!