श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचराचा चोखंदळ महिला वाचक पुरस्कार निशा पटवर्धन यांना जाहीर….!

१ ऑगस्ट रोजी होणार पुरस्कार वितरण

आचरा (प्रतिनिधी) : ॲड. सायली मारुती आचरेकर पुरस्कृत मारुती प्रभाकर आचरेकर स्मरणार्थ श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराचा चोखंदळ महिला वाचक २०२६ पुरस्कार आचरा वरची वाडी येथील निशा यशवंत पटवर्धन यांना जाहीर झाला आहे. पटवर्धन यांना धार्मिक पुस्तके वाचण्याची अत्यंत आवड असून ज्येष्ठ नागरिकांची सेवा तसेच प्राणीमात्रांची सेवा करण्यात त्यांना विशेष आनंद आहे. नियमितपणे वाचनालयात येऊन त्या धार्मिक पुस्तकांबरोबरच वैचारिक व चरित्रात्मक पुस्तके वाचण्यावर जास्त भर देतात. त्यांच्याकडे वक्तृत्व गुण जरी कमी असले तरीही त्यांना आवडलेल्या पुस्तकांवर त्या ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधून आवडलेल्या पुस्तकाबाबत आपले मनोगत व्यक्त करतात. आपल्या घरच्या कामाबरोबरच सवड काढून त्या वाचनमंदिरात पुस्तके वाचण्यात त्या आपला बराचवेळ खर्च करतात आणि यामुळेच यावर्षीचा महिला चोखंदळ वाचक पुरस्कार निशा यशवंत पटवर्धन यांना जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प असे असून सदरचा पुरस्कार त्यांना संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी बहाल करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!