खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ आज बुधवार दि.२२ जुलै २०२६ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यावेळी जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, उपाध्यक्षा संध्या पोरे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक योगेश गोडवे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत, खारेपाटण प्रा.आ केंद्राचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी सिद्धेश बेळेकर, आरोग्य सेवक मिथुन गेडाम, स्टाफ नर्स प्रमिला पाटणकर, टेली मेडिसन को ऑर्डिनर पार्थ पटवर्धन, आशा स्वयंसेविका गतप्रवर्तक संकिता पाटणकर, आशा स्वामसेविका सौ शिल्पा मेस्त्री, माधवी कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे व माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे यांनी विद्यार्थ्यांना माजी उपमुख्यमंत्री अजितदादा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यांच्या कार्याविषयी साखोल मार्गदर्शन केले. तर माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी अजित दादा यांच्या सामाजिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व सतत जनतेच्या कामात व्यस्त असलेला हजरजबाबी परखड नेता असा त्यांचा उल्लेख केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या पदवीधर शिक्षिका शीतल राठोड, सहाय्यक शिक्षिका दीपिका चव्हाण, अबिदा काझी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या शिक्षिका समीक्षा राऊत यांनी केले.













