१०६ विद्यार्थ्यांचे रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी
खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ आज बुधवार दि.२२ जुलै २०२६ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांच्या सौजन्याने व प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर व शालेय विद्यार्थी ओळखपत्र तयार करण्याच्या कार्यक्रम नुकताच संपन्न झाले.यावेळी प्रशालेतील सुमारे १०६ शालेय विद्यार्ग्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तर या आरोग्य शिबिराला जि.प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, उपाध्यक्षा संध्या पोरे,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक योगेश गोडवे,माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत,खारेपाटण प्रा.आ केंद्राचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी सिद्धेश बेळेकर,आरोग्य सेवक मिथुन गेडाम,स्टाफ नर्स प्रमिला पाटणकर,टेली मेडिसन को ऑर्डिनर पार्थ पटवर्धन,आशा स्वयंसेविका गतप्रवर्तक सौ संकिता पाटणकर,आशा स्वामसेविका शिल्पा मेस्त्री, माधवी कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा रक्तगट नमुना तपासण्यात आला. व हिमोग्लोबीनचे प्रमाण देखील तपासण्यात आले.याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी टेलिमेडिसिन को ऑर्डिनर पार्थ पटवर्धन यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.तर स्टाफ नर्स प्रमिला पाटणकर यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या समस्या व याबाबत घ्यावयाची काळजी याविषयी महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी “आजचा शालेय विद्यार्थी हा उद्याच्या भारताचे भविष्य असून त्यांना आरोग्य विषयक व शैषणिक दृष्ट्या मजबूत बनवणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.” यावेळी शाळेच्या सर्व १०६ विद्यार्थ्यांचे शाळेत फोटो काढून त्यांची सर्व माहिती अपडेट करण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्याचे नाव,इयत्ता,शाळेचे नाव,जनरल रजिस्टर नंबर,आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर,रक्तगट नमुना व पूर्ण पता याचा समावेश असेल विद्यार्थ्याची परिपूर्ण माहिती असलेले नवीन शालेय ओळखपत्र सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे यावेळी संतोष पाटणकर यांनी सांगितले.याकरिता योगेश गोडवे यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या पदवीधर शिक्षिका शीतल राठोड, सहाय्यक शिक्षिका दीपिका चव्हाण,अबिदा काझी यांनी विशेष परिश्रम घेतले.तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या शिक्षिका समीक्षा राऊत यांनी केले.












