वैभववाडी (प्रतिनिधी) : त्याग व सेवा, न्यायाची चाड व अन्यायाची चीड हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेली शिक्षक समिती सातत्याने विद्यार्थी हिताचे व समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६४ व्या स्थापना दिनानिमित्त पंचायत समिती वैभववाडीच्या “समृद्ध ग्रंथालय” उपक्रमास योगदान म्हणून आपल्या संघटनेच्या वतीने सुमारे पस्तीस हजार किमतीची दर्जेदार पुस्तके प्रदान करण्यात आली. असे प्रतिपादन सभापती सिद्देश रावराणे यांनी केले
पंचायत समितीच्या वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनीही मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमास पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य सुवर्णा संसारे, देवानंद पालांडे, शिक्षक नेते सुनील चव्हाण, संजय पाताडे, शिक्षक पतपेढी संचालक संतोष मोरे, तज्ज्ञ संचालक महादेव शेट्ये, जिल्हा प्रवक्ते सुधीर गोसावी, माजी तालुकाध्यक्ष अनिल खांबल, जिल्हा प्रतिनिधी स्वप्निल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या स्थापना दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरात विविध शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक समिती तालुकाध्यक्ष विवेकानंद कडू, कार्याध्यक्ष संतोष भरडकर, महिला सेल अध्यक्षा दिव्या भोसले, सचिव वेलांकणी गुरव यांच्यासह अंकुश सुतार, गंगाराम अडुळकर, पंढरीनाथ सावंत, शरयू कदम, दीप्ती पाटील, प्रियंका रावराणे, जयवंत मोरे, विकास नर, मोहन कांबळे, हनुमंत सुतार, सुधीर बावडेकर, अंबादास चेमटे, शिवराज करले, सचिन कनोजे, विनोद खंडागळे, संध्या दौंड, सुषमा पावसकर, सपनावती चव्हाण, सीमा म्हस्के, सारिका उरणे व सर्व समिती शिलेदारांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक समिती सचिव प्रफुल्ल जाधव यांनी केले तर आभार पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी संतोष टक्के यांनी मानले.
पुस्तके दान करण्याचा शिक्षक समितीचा उपक्रम आदर्शवत: सभापती सिद्धेश रावराणे












