कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली चे कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडून आले असून, 2026 ते 2029 पर्यंत कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. आज या अंतिम दिवशी कार्यकारी मंडळाची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी द. ल. सावंत यांनी जाहीर केले आहे. यामध्ये विजयकुमार वळंजु हे सचिव पदी, सतीश विजय नाईक विश्वस्त, अनिल लक्ष्मण डेगवेकर विश्वस्त मंगेश परशुराम कामत विश्वस्त यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर कार्यकारणी सदस्य पदी शिवराम प्रभाकर म्हसकर, यशवंत उत्तम खोत अॅड. उमेश सुरेश सावंत मंदार श्रीकृष्ण सापळे डॉ. अनंत रघुनाथ नागवेकर गोविंद यशवंत नार्वेकर शिवप्रसाद लिंगाप्पा उचले सुनील माधव नाडकर्णी डॉ. राजश्री संदीप साळुंखे, हेमंत सुरेश गोवेकर डॉ. सविता विष्णू तायशेटे या सर्वांची कार्यकारिणीच्या सदस्य पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून द ल. सावंत यांनी कामकाज पाहिले.
कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारिणी निवडणूक झाली बिनविरोध











