बांद्यात एन.सी.एम.सी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० लाभार्थ्यांची नोंदणी

बांद्यात स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; १० ऑगस्टला होणार कार्डांचे वितरण

बांदा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या पुढाकाराने ग्रामसचिवालय, बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सुमारे २०० लाभार्थ्यांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली. शिबिराचे उद्घाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे अध्यक्ष अन्वर खान, उपाध्यक्ष महादेव वसकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, खजिनदार जगन्नाथ सातोसकर, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक बी. एस. नाईक, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, बांदा देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम सावंत, अर्चना सावंत तसेच ऑपरेटर पूर्वा जाधव उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी पात्र ज्येष्ठ नागरिक, महिला व अन्य लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या एन.सी.एम.सी स्मार्ट कार्डासाठी एकाच ठिकाणी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिराचे नियोजन आणि नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ज्येष्ठ नागरिक विकास मंचच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना एन.सी.एम.सी स्मार्ट कार्डचे वितरण सोमवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ग्रामसचिवालय, बांदा येथे करण्यात येणार असून, लाभार्थ्यांनी आधारशी संलग्न असलेला मोबाईल सोबत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!