खारेपाटण येथील वीज अभियंता कार्यालयाला ग्रामस्थांचा घेरावा

“नागरिकांच्या वीज समस्या तत्काळ न सोडविल्यास कार्यालयास ठोकणार टाळे “- प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शहर व विभागातील गावामध्ये वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा तसेच येथील वीज कार्यालयात असणारा अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या विविध समस्यांच्या निषेधार्थ आज खारेपाटण विभागातील सरपंच व नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर यांच्या नेतृत्वाखाली खारेपाटण येथील वीज कार्यालायाला धडक देत वीज कार्यालयाला घेरावा घातला. तर नागरिकांना होत असलेल्या वीज समस्येच्या त्रासाबद्दल कडक शब्दात जाब विचारला.

खारेपाटण रामेश्वर नगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित उप कार्यकारी अभियंता कार्यालयाला घालण्यात आलेल्या घेरावा प्रसंगी पंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, चिंचवली सरपंच अशोक पाटील, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे, वायंगणी उपसरपंच प्रताप फाटक, कुरंगावणे माजी उपसरपंच बबलू पवार, साळीस्ते उपसरपंच उदय बारस्कर, खारेपाटण माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले, सुधाकर ढेकणे, मनाली होणाळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, याबरोबर सचिन शिंदे, विजय सावंत, श्री लाड, चंद्रकांत हरयाण, मंगेश कांबळे, विजय मेस्त्री आदी मान्यवर लोकप्रतिनिधी व भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खारेपाटण विभागात सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू असून यामुळे नागरिक हैराण झाले असून खारेपाटण मध्ये किमान १४ विद्युत कर्मचारी वर्गाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात कमी कचऱ्याकडून काम करून घेतले जात आहे. तर जे कर्मचारी दिले आहेत. ते देखील अप्रशिक्षित कर्मचारी असल्याने त्याचा वीज कामाच्या सेवांवर परिणाम होत आहे. तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित करणे ही येथील मोठी समस्या असून येथे उपस्थित नागरिकांना वीज समस्यांचा पाडा वाचत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर ग्रामस्थांच्या आजच्या चर्चेला वैभववाडी येथील उप कार्यकारी अभियंता शिरोडकर यांना बोलावले असताना देखील ते अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेत ते का ? येऊ शकले नाही. असा जाब विचारला. यावेळी आपले म्हणणे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून येथील समस्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सहायक अभियंता सकपाळ यांनी सांगितले. तर येथील ग्रामस्थांच्या असलेल्या विविध वीज समस्या तत्काळ न सोडविल्यास दि.२८ जुलैला येथील वीज कार्यालला टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा जि.प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी यावेळी वीज अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान खारेपाटण विभागातील नागरिकांनी आपल्या मांडलेल्या विविध मागण्या व समस्या पुढील प्रमाणे – १)कर्मचारी वर्गाची कमतरता एकूण १४ कर्मचारी वर्गाची मागणी. २)शिकवू कर्मचारी वर्गाची नेमणूक करणे ३) मीटर रिडिंग वेळेवर घेतले जात नाही. त्यामुळे भरमसाठ बिल येते. ४)कुरंगावणे, गाडेवाडी विद्युत ट्रान्सफॉर्मर २ वर्षे झाली अजून बदललेला नाही. ४) खारेपाटण टाकेवाडी नवीन विद्युत् लाइन जोडणी जंगल भागातील रद्द करून हायवे वरून जोडण्याची मागणी. ५)शेर्पे येथील धोकादायक विद्युत पोल बदलण्यात यावेत ६) स्मार्ट नवीन वीज मीटर नागरिकांच्या परवानगी शिवाय बसवू नयेत. ७) चिंचवली येथील सडलेले ट्राम्समिटर बॉक्स पेटी बदलण्यात यावी. ८) चिंचवली येथील शेतातून गेलेली वीज वाहिनी बदलण्यात यावी. त्याकरिता १० वीज पोल मंजूर करावेत. ११) खारेपाटण पंचशील नगर येथे पोमेडकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन विद्युत् पोल बसवीण्यात यावे. याकरिता ६ विद्युत पोलची मागणी. १२) चिंचवली वरचीवाडी जंगल भागातील ट्रान्स्फर सुरक्षित जागेत बसविणे. १३)साळीस्ते गावाचा वीज पुरवठा खारेपाटण येथूनच पूर्ववत करावा. १४) खारेपाटण येथील मंजूर वीज कामासाठी कॉन्ट्रॅक्टर नसल्याने अनेक वीज कामे प्रलंबित आहेत. याकरिता तातडीने कॉन्ट्रॅक्टराची नेमणूक करावी. आदी मागण्या यावेळी ग्रामस्थानी वीज अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

error: Content is protected !!