मनाई आदेश भंगप्रकरणी मंत्री नितेश राणे, आ. प्रमोद जठार सह सर्वांची निर्दोष मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : 17 डिसेंबर 2022 रोजी तत्कालीन आमदार श्री नितेश राणे ,तत्कालीन माजी आमदार प्रमोद जठार व भारतीय जनता पार्टीच्या अन्य कार्यकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू असताना एसटी स्टँड समोर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद च्या सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बद्दल व भारत देशाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ निदर्शने करून बिलावल दरदारी भुट्टो यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करून निषेध करून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हवालदार श्री विनोद सुबराव चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीस अनुसरून प्रमोद जठार व नितेश राणे , सौ प्रज्ञा ढवण, हर्षदा वाळके, राजश्री धुमाळे, किशोर राणे, रवींद्र शेट्ये ,गणेश तळेगावकर, महेश सावंत, रवींद्र गायकवाड ,प्रदीप ढवण वगैरे 16 यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या कामी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर कामी साक्षीदारांची जबाब होऊन वरील सर्व आरोपींची पुरावे अभावी मेहरबान न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पालकमंत्री नितेश राणे व आमदार प्रमोद जठार वगैरे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकरिता ऍड. राजेश परुळेकर व ऍड. ओंकार परुळेकर यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!