चित्रकाराने साकारली उपरण्यावर माऊलीची प्रतिमा

कणकवली (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने पारंपरिक भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या उपरण्यावर भगवान श्री विठ्ठलाचे हस्तचित्र साकारण्यात आले आहे. कॅनव्हासऐवजी उपरण्यासारख्या पारंपरिक वस्त्रावर चित्र रेखाटून वारकरी परंपरेचा, भक्तीचा आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा संगम घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपरणे हे वारकरी संप्रदायात सन्मान, शुद्धता, सेवाभाव आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे याच उपरण्यावर विठ्ठलाचे चित्र साकारून आषाढी एकादशीचा आध्यात्मिक संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या कलाकृतीतून “भक्ती, संस्कृती आणि कला” यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. तरुण पिढीने आपल्या परंपरा आणि संस्कृतीशी जोडले जावे, तसेच भारतीय कलेचा आणि वारकरी परंपरेचा अभिमान जपावा, हा या कलाकृतीमागील मुख्य उद्देश आहे. हे चित्र ऍक्रेलिक कलर च्या माध्यमधून साकारलेले असून चित्राची उंची 3फूट आणि रुंदी 2.५ फूट एवढी आहे.
चित्रकार अक्षय मेस्त्री
7744833983

error: Content is protected !!