वालावलकर रुग्णालयाच्या इ. एन. टी विभागातर्फे मोफत शस्त्रक्रिया शिबिराची नाव नोंदणी सुरू

दि. 3 ते 10 ऑगस्ट दरम्यान इ .एन .टी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

चिपळूण (प्रतिनिधी) : दिनांक 3 ते 10 ऑगस्ट दरम्यान वालावलकर रुग्णालयाच्या कान नाक घसा विभागातर्फे मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नाकाच्या हाडाचे, सायनसचे,कानाच्या पडद्याचे, कानाच्या हाडाचे,टॉन्सिल- एडीनाईडचे (Tonsil-Adenoid),अश्रू पिशवीचे, लाळ ग्रंथीचे तसेच थायरॉईडचे ऑपरेशन्स करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठीची नाव नोंदणी वालावलकर रुग्णालयात उद्यापासून म्हणजेच दि.14/7/2026 पासून होणार आहे, तरी सर्व पेशंट्स नी वालावलकर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागात प्राथमिक तपासणी करून नाव नोंदणी करून घ्यावी असे आव्हान इ.एन. टी सर्जन डॉक्टर प्रतीक शहाणे यांनी केले आहे.

“महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना,अशा विविध योजना व असे मोफत शस्त्रक्रिया शिबिर राबवून गरीब व गरजू रुग्णांसाठी वालावलकर रुग्णालय तारणहार बनले आहे. तरी सर्व कान- नाक- घशाचा त्रास असलेल्या गरजू रुग्णांनी या शिबिराच्या लाभ घ्यावा “असे आव्हान रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील मॅडम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिन धुमाळ यांना संपर्क साधावा-9272897834.

error: Content is protected !!