ह्यूमन राईट सावंतवाडी तालुकाच्या वतीने शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गौरव

आचरा (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडीच्या वतीने तालुक्यातील सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा नंबर 2 मधील तब्बल 14 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आले होते या विद्यार्थ्यांचे संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. कु.आराध्य आपटे हा विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्हात प्रथम तर राज्यात नववा आला. एकाच प्राथमिक शाळेतून एकूण 14 मुले जिल्हा राज्य पातळीवर गुणवत्ता यादीत झळकल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हासह शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रातून या विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, शाळा समिती, पालक वर्गाचे, सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

या कौतुक सोहळ्याला ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव तथा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सावंतवाडी तालुका सल्लागार सुधीर पराडकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा व्हिजन आय प्लस शिरोडाचे प्रोप्राटर सोहन शारबिद्रे, उपाध्यक्ष तथा नगरसेविका शर्वरी धारगळकर, जिल्हा महिला संघटक शिवानी पाटकर, सचिव मेघना साळगांवकर, बांदा शहर अध्यक्ष कृष्णा गवस, नितीन नाईक, साक्षी गवस, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, रेश्मा परब, कणकवली ट्रॉफी हाऊसचे प्रोपायटर व महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!