सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : आईचा कोयत्याने निघृण खून केल्याच्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी रवींद्र रामचंद्र साेरप (रा. वारगाव, सुतारवाडी, ता. कणकवली) याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी दुसन्यांदा फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
१० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री वारगाव येथील राहत्या घरी प्रभावती रामबंद्र साेरप (८०) यांचा खून झाल्याची बाब समोर जाली होती मुलगा रवींद्र याने हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या घटनेनंतर फिर्यादी भिकू रामबंद्र सोरप यांनाही त्याने जीव मारण्याची धमकी देत कोयता येऊन धाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३, २०५१०२), ३५२ व १३१ अन्येमुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमावती यांच्या शवविच्छेदन अहवालात अतिरक्तस्राव आणि कवटीच्या तळाशी फ्रैक्चर झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळ पंचनामा आणि अन्य पुरावे गोळा करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. जामीन अर्जाला विरोध करताना सरकार पक्षाने संशयित आरोपीवर गंभीर गुन्हा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तो घटनास्थळावरून पळून गेला होता. जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची तसेच पुन्हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. अशा आरोपीला जामीन दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि तपासातील उपलब्ध पुरावे विचारात घेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी आराेपीचा जामिन अर्ज फेटाळून लावला.












