कै. महेश नार्वेकर प्रथम स्मृतिदिनी नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांना धान्यवाटप

कणकवली (प्रतिनिधी) : प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. समाजात घटना घडतात. त्यातून प्रत्येकाने बोध घेत पुढे चालले पाहिजे. महेश नार्वेकर यांनी आपल्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली असती तर आपल्याला आज हा स्मृती दिनाचा कार्यक्रम करण्याची वेळच आली नसती. परंतु नियतीच्या जे मनात असते ते कोणी पुसू शकत नाही. असा दिलदार मित्र शोधून सापडणे सध्याच्या जगात कठीण आहे. त्यामुळे महेश नार्वेकर यांच्या जाण्याने आमचे सर्वांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांचा समाजसेवेचा वारसा आपण सर्वांनी चालवण्याचा जो स्तुत्य उपक्रम हाती घेतला तो वाखाणण्याजोगा आहे. असे उद्गार कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काढले कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये महेश नार्वेकर यांच्या प्रथम समिती दिनानिमित्त नगरपंचायत च्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत धान्य भेटू वाटपाच्या कार्यक्रमात दरम्यान ते बोलत होते महेश नार्वेकर मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या किटमध्ये सहा प्रकारचे धान्य नगरपंचायत च्या पन्नास सफाई कर्मचाऱ्यांना मोफत धान्य किट वाटप करण्यात आले. यावेळी महेश नार्वेकर मित्र मंडळाचे गौरव गवाणकर रवी बाणे, मिंगेल मतेरो, नवीन बांदिवडेकर, चंदन पाटील, चिंटू नार्वेकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, समीर सावंत, सचिन कुवळेकर, विनोद भंडारी, पंकज पेडणेकर, उमेश वाळके, प्रसाद अंधारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रमेश जोगळे यांनी केले.

error: Content is protected !!