सेंद्रिय खतामध्ये स्वनिर्मित जीवामृत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला वरदान – लोरे नंबर दोनच्या महिला बचत गटाला विश्वास

कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कृषी सम्राट गटाकडून जीवामृताचे प्रात्यक्षिक संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत,कृषी सम्राट गटामार्फत लोरे नंबर दोन येथे अक्षय फार्म महिला बचत गटाच्या महिलांच्या उपस्थितीत आणि कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट यांच्या मार्गदर्शनाखाली जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले…

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जीवामृत फायदेशीर ठरते. यावेळी कृषी सम्राट गटाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना जीवामृताचे महत्त्व,त्याचे पिकावरील फायदे, ते तयार करण्याचे साहित्य व त्याचे प्रमाण याचे सविस्तर विवेचन केले.त्यानंतर प्रात्यक्षिक दाखवताना दहा किलो देशी गाईचे शेण, दहा लिटर गोमूत्र,दोन किलो सेंद्रिय गुळ, दोन किलो कडधान्याचे पीठ, दोन किलो सुपीक माती, आणि १७० लिटर पाण्याचा वापर करून जीवामृत मिश्रण तयार केले. हे मिश्रण पाच-सात दिवस सावलीत ठेवून वारंवार ढवळावे. तयार झालेले जीवामृत सिंचनाच्या पाण्यात सोबत झाडांच्या मुळाजवळ वापरण्याची पद्धत यावेळी समजून सांगण्यात आली…

सेंद्रिय शेतीतील जीवामृताचा वापर शेतकऱ्यांसाठी आणि उत्पन्नासाठी वरदान ठरेल, असा विश्वास उपस्थित बचत गटाच्या महिलांनी व्यक्त केला.या प्रात्यक्षिकात वेदांत घाग, स्वयंभू प्रभूदेसाई, प्रतीक चौधरी,सिद्धांत शिंदे,करण बनने,आर्यन सावळे, निखिल नागर,आदित्य प्रभूदेसाई, रिसल मस्केरेन्हस, आशीम महंती यांनी सहभाग घेतला,,

error: Content is protected !!