ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात वृक्षारोपण; अध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या संकल्पनेतून नारळ लागवड..!

आचरा (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ज्ञानदीप संस्था, वायंगणीच्या आवारात नारळाच्या रोपांची लागवड करून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून हा उपक्रम राबविण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमात संस्थेचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू, मुख्याध्यापक श्री. टकले तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली.

रोपांच्या लागवडीसाठी आवश्यक असलेले खत प्रफुल्ल माळकर यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. ते स्वतः या उपक्रमास उपस्थित राहून सहभागी झाले. तसेच रोपांची लागवड करण्यासाठी उमेश मालपेकर, अजय सावंत, संजय सावंत व हनु पुजारे यांनी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी आणि परिसर हिरवाईने नटावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, शिक्षक व पर्यावरणप्रेमींकडून कौतुक करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत ज्ञानदीप संस्थेने राबविलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!