बांदा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा, दोडामार्ग नं. 1 येथे आयोजित वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात पार पडला.या उपक्रमामध्ये वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते शाळेसाठी वॉटर प्युरिफायरचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित आणि आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.
या उपक्रमामागे एकच भावना होती — आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम आरोग्याची हमी मिळाली पाहिजे.
या उपक्रमातून तब्बल 96 विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपण उचलत आहोत, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. कारण निरोगी शरीरातच निरोगी विचार वाढतात आणि त्यातूनच देशाचा सक्षम नागरिक घडतो.
वेदिकाताई विशाल परब
“आज आपण इथे फक्त एक मशीन देत नाही आहोत, तर आपल्या मुलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया घालत आहोत.
ग्रामीण भागात अनेक वेळा पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या समस्या टाळण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.
माझी मनापासून इच्छा आहे की, आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी निरोगी राहावा, चांगले शिक्षण घ्यावे आणि उद्या मोठे होऊन आपल्या गावाचे, आपल्या आई-वडिलांचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे.
हा उपक्रम इथेच थांबणार नाही, पुढील काळातही अशाच सामाजिक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील.”
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शिक्षक व ग्रामस्थांचे समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. एकता एकनाथ नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुमित गोपाळ दळवी, श्री. रंगनाथ गवस, तसेच सर्व शिक्षकवर्ग, ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!












