सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथील धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटत असताना नागाने चावा घेतल्यामुळे हम्पी येथील पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर त्याला तात्काळ प्राथमिक रुग्णालयाचा प्रयत्न रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु ट्राफिक मध्ये अॅम्बुलन्स अडकल्यामुळे उपचारा अभावी त्याचे निधन झाले गंगाधर मरप्पा (वय ३८) असे त्याचे नाव आहे याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हम्पी येथील काही पर्यटक वर्षापर्यंतचा आनंद लुटण्यासाठी आंबोली धबधबा येथे आले होते मुख्य धबधब्याच्या बाजूला असलेल्या आंघोळ करत असताना अचानक एका सापातील चावा घेतला त्यात ते धारातीर्थी पडले अशा अवस्थेत त्यांना आंबोली प्राथमिक केंद्रात निर्माण झाले मात्र त्या ठिकाणी उपचार होणार नसल्यामुळे पुन्हा त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाकडे आणण्यात आले, परंतु मुख्य धबधबब्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्यामुळे खाली येण्यासाठी तब्बल अडीच तासाचा कालावधी लागला व उपचार शकल्यामुळे त्या पर्यटकाचे वाटेतच त्याचे निधन झाले संबंधित चावा घेणारा साप हा मण्यार किंवा नाग जातीचा असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला, आहे. असून शवविच्छेदनानंतर अधिक माहिती मिळू शकेल असे त्यांचे, म्हणणे आहे.
ट्राफिक जाम ने घेतला पर्यटकाचा जीव












