मनसेच्या कांदिवली विधानसभा उपविभाग सचिवपदी चंद्रशेखर सावंत यांची फेरनिवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील नापणे गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर धोंडू सावंत यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कांदिवली विधानसभा प्रभाग क्रमांक २९ व ३६ च्या उपविभाग सचिवपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर सावंत हे वैभववाडी तालुका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून, सलून ब्युटी पार्लर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तसेच मालाड शाखेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक, संघटनात्मक आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. मनसेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्न तसेच नागरिकांच्या विविध समस्यांसाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पुन्हा उपविभाग सचिवपदाची जबाबदारी सोपविली आहे. सावंत यांच्या फेरनिवडीबद्दल वैभववाडी तालुका सामाजिक संस्था तसेच सलून ब्युटी पार्लर असोसिएशन मालाड शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!