काळसे श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण सोहळा २ ते ४ फेब्रुवारी रोजी

.
श्री गणेश व विठ्ठल रखुमाई मूर्ती स्थापनाही होणार
चौके( प्रतिनिधी ) : काळसे गावची कुलस्वामिनी श्री देवी माऊलीच्या सुमारे २०० वर्षांपुर्वीच्या देवालयाच्या जीर्णोद्धाराचे काम पुर्णत्वास आले असून गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी ते शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत प. पू. स्वामी विपाप्मानंद , रामकृष्ण मठ,धंतोली, नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व काळसे गावचे सुपुत्र आमदार श्री सुनिल प्रभु , व आमदार ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण विधी सोहळा व मंदिर वास्तुपूजन आणि श्री गणेश व विठ्ठल रखुमाई मूर्ती स्थापना विधींसह संपन्न होणार आहे.
श्री देव रवळनाथ श्री देव लिंगेश्वर देवालय ट्रस्ट, काळसे आणि श्री देवी माऊली मंदिर जिर्णोद्धार निधी संकलन समिती, मुंबई च्या वतीने या तीन दिवस चालणाऱ्या भव्यदिव्य अशा कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कलशारोहण सोहळ्यानिमीत्त गुरुवार दिनांक
२/२ /२०२३ रोजी सकाळी ७ वाजता गणेशपुजन , पुण्याहवाचन, मातृकापूजन , ब्राह्मणपुजन त्यानंतर सकाळी १० वाजता स्थापित देवता , ६४ योगीनी , वास्तू क्षेत्रपाल सर्वतोभद्र मंडळ प्रधान देवता पुजन, सकाळी १० ते १ मुर्ती व कलशांची मिरवणूक , दुपारी १ ते ३ धान्यादिवास शय्यादिवास महाप्रसाद , आणि सायंकाळी ७ नंतर नामांकित भजनी बुवांचे वारकरी भजन होणार आहे.
शुक्रवार दिनांक ३/२/२०२३ रोजी सकाळी ७ वाजता प्रात: पुजन स्थापित देवतांचे देवता स्थापन विधी, अग्नि स्थापना, हवन , दुपारी १२ वाजता कलशारोहण , मुर्ती स्थापना, अभिषेक पुजा आणि हवन, दुपारी ३ वाजता आरती , महाप्रसाद , सायंकाळी ७ नंतर सुप्रसिद्ध दशावतारी नाटक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आणि शनिवार दिनांक ४/२/२०२३ रोजी सकाळी ८ वाजता स्थापित देवता पुजन अभिषेक , हवन, पुर्णाहुती. दुपारी १२ वाजता महाआरती महाप्रसाद आणि सायं. ७ नंतर स्थानिक भजनी बुवांची सुश्राव्य भजने होणार आहेत. अशाप्रकारे श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान भरगच्च धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व मान्यवर ग्रामस्थ , देणगीदार हितचिंतक तसेच सर्व माहेरवाशिणी , आणि भाविक भक्तांनी या पवित्र धार्मिक विधी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी माऊली मंदिर जिर्णोद्धार निधी संकलन समिती, मुंबईचे अध्यक्ष श्री. अनिल प्रभु , सेक्रेटरी विजया परब , खजिनदार गणेश प्रभु , संपर्क प्रमुख उमेश प्रभु यांनी केले आहे.

error: Content is protected !!