सावंतवाडी (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र, श्रीराम वाचन मंदिर आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या मार्फत आयोजित वक्तृत्व स्पर्धा श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहामध्ये उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण वेळी ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर, श्रीराम वाचन मंदिर कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर, युवा पुरस्कार प्राप्त निरवडे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव, अनुभव शिक्षा केंद्र जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, पब्लिक रिलेशन फाउंडेशन संस्थापक, अनुभव युवा मंच कार्याध्यक्ष युवती पुरस्कार प्राप्त फिजा मकानदार, परीक्षक समील नाईक आणि रायगड येथील लक्ष्मण कचरे, तुषार परब, नासिर मकानदार,कॉलेजचे ओटवणेकर मॅडम,परब मॅडम, मल्लसम्राटचे ललित हरमलकर,मिताली राऊळ, शिवानी मेस्त्री, भाविका कदम, श्रुती सावंत, सुदीप दिगवळेकर उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. कामाक्षी महालकर, द्वितीय क्रमांक कु.श्रावणी राजन आरवंदेकर,तृतीय क्रमांक कु.सिद्धी शशिकांत सावंत आले. यांना अनुक्रमे 5000, 3000, आणि 2000 सोबत सन्मानचिन्ह, सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी कमलताई परुळेकर यांनी युवांना भगतसिंग यांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. ऍड संदीप निंबाळकर यांनी युवांनी मिळून असे उपक्रम आणि संवाद कार्यक्रम श्रीराम वाचन मंदिर येथे राबवावेत यासाठी आमची मदत सर्वतोपरी असणार आहे.परीक्षक लक्ष्मण कचरे यांनी उत्तम वक्ता तोच जो चांगला श्रोता असतो सोबतच कबीरांचे दोह्यांमधून सध्याची परिस्थिती दाखविली. समील नाईक यांनी वक्ता बनण्याचे पैलू सांगितले. त्याची सांगड विषयांशी घातली.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र शासन युवक पुरस्कार प्राप्त जयराम जाधव आणि युवती पुरस्कार प्राप्त फिजा मकानदार यांच्या हस्ते झाले. यावेळी जयराम जाधव यांनी युवक कसा असावा याबाबत आपल्या कौशल्यातून मांडणी केली. सोबतच फिजा मकानदार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सहदेव पाटकर, सूत्रसंचालन भाविका कदम व श्रुती सावंत आणि आभार शिवानी मेस्त्री यांनी मांडले.












