कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक

कोल्हापूर येथील मुख्य आरोपी शुभम कृष्णांत देशमुख याच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ

फिर्यादी तर्फे ॲड.श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड. तारिका चिंदरकर कुबल, ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली

मालवण (प्रतिनिधी) : कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवित मालवण येथील भारती घारकर व अन्य गुंतवणूकदार यांची तब्बल ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी प्रमुख संशयित मुख्य आरोपी शुभम कृष्णात देशमुख (२७ ) राहणार कोल्हापूर एकोंडी कागल सध्या राहणार कळंबा जेल नजीक माननीय मे. न्यायालय मालवण यांनी दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सात दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. आज दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी आरोपी शुभम याला न्यायालयात हजर केले असता, मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, तपासामध्ये आरोपीकडून तांत्रिक पुरावे तसेच फसवणूक केलेली रक्कम याबद्दलची अजून माहिती समोर येण्यासाठी आरोपीला आणखी तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. उज्वला जाधव यांनी बाजू मांडली व फिर्यादीतर्फे ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड तारिका चिंदरकर-कुबल , ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांनी सरकारी पक्षास सहाय्य केले. सुनावणीअंती तपासकामात आरोपीची पोलीस कोठडीची आवश्यकता विचारात घेऊन मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी संशयितांला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे करीत आहेत. यावेळी मालवण न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने कोल्हापूर, मालवण व इतर ठिकाणांहून फसवणूक ग्रस्त नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!