केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ तथा आप्पासाहेब शिंदे यांचे सखोल मार्गदर्शन !
फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : राधेश्याम बँक्वेट्स अँड लॉन्स, कृष्णानगरी, जानवली, कणकवली येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात संपन्न झाले.या सभेस केमिस्ट्र हृदय सम्राट जगन्नाथ सखाराम शिंदे (आप्पासाहेब शिंदे) प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी औषध विक्रेत्यांच्या संघटनेला मजबूत दिशा देण्यासाठी MSCDA व AIOCD यांच्या कार्याची भूमिका आणि संघटनात्मक बांधणी याबाबत अत्यंत मोलाचे व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
तसेच त्यांनी Educational & Welfare Trust च्या माध्यमातून औषध विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या माध्यमातून फार्मासिस्टांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी नवीन कायदे व नियम,औषध वितरण व्यवस्थेचे भवितव्य,फार्मासिस्ट व औषध विक्रेत्यांची भूमिका या विषयावर महत्व पूर्ण माहिती दिली, आजच्या स्पर्धेच्या युगात संघटनात्मक एकजूट कशी आपला व्यवसाय टिकून राहू शकतो व व्यवसायातील नव्या संधी कश्या निर्माण होऊ शकतात याचा उहापोह केला. या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित सभासदांना व्यवसाय, संघटना आणि सामाजिक बांधिलकी याबाबत नवी दिशा व सकारात्मक ऊर्जा मिळाली.
या सुंदर व यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कणकवली तालुक्यातील सर्व सभासद व पदाधिकारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक व मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय झाला.
तसेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या प्रत्येक सभासदाने आवर्जून उपस्थित राहून या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
“सेवा • समभाव • सचोटी • सहकार्य • शिस्त”अन् सर्वांचे प्रेम, सहकार्य आणि मार्गदर्शन त्यामुळे कणकवली तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे नियोजन यशस्वी झाल्याचे सर्वांनी कौतुक होत आहे.













