रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांना एज्युकेशन ॲपचे वितरण

देवगड (प्रतिनिधी) : रोटरी क्लब मँगो सिटी, देवगड यांच्या वतीने अ. कृ. केळकर हायस्कूल, वाडा येथे १८ ऑगस्ट २०२६ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन ॲपचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात रोटरी क्लबच्या अध्यक्षा अनुश्री पारकर, उपाध्यक्ष विजय बांदिवडेकर, खजिनदार अनिल गांधी तसेच सदस्य नरेश डामरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयुक्त असलेल्या ॲपचे वितरण करून त्याच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक सुविधांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास उपस्थित रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका तेली मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा समितीचे अध्यक्ष हर्षद जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी व सुलभ पद्धतीने घेण्यासाठी उपयुक्त शैक्षणिक साधन उपलब्ध झाले.

error: Content is protected !!