खारेपाटण येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी बुधवार दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशालेच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात संपन्न झाली. यावेळी खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते. तर या आरोग्य तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचे डॉ.सूरज कुडतरकर, डॉ.प्रणिता आबदार, फार्मसिस्ट आदित्य काजरेकर, आरोग्य सेविका प्राप्ती सावंत उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरात खारेपाटण हायस्कूल मधील सुमारे इयत्ता ५ वी ते ८ वी च्या सुमारे ३०० विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर डॉ प्रणिता आबदार यांनी किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करून त्यांना आपल्या चांगल्या आरोग्याच्या विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी आरोग्य शिबिरात सहभागी आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!