‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’; शंकर सावंत आजोबांचा मृत्यूनंतरही समाजासाठी उपयोगी देह

निराधार आजोबांचे नेत्रदान, देहदान; मृत्यूनंतरही समाजसेवेचा वसा

कणकवली (प्रतिनिधी) : शंकर पांडुरंग सावंत वय 72 हे आजोबा गेली पाच वर्ष दिविजा वृद्धाश्रम मध्ये निराधार म्हणून राहत होते. शंकर सावंत आजोबा आश्रम मध्ये येण्यापूर्वी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे अनोळखी व्यक्ती म्हणून दाखल झाले ते शारीरिकरित्या खूप त्रासलेले होते काही महिने जिल्हा रुग्णालयात एका वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांच्यावर योग्य ती उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली ओरोस हॉस्पिटलच्या मार्फत counsilar श्रीम रेश्मा बाईप मॅडम यांनी दिविजा वृद्धाश्रम चे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्याशी संवाद साधून त्यांची माहिती दिली व शंकर सावंत आजोबांचे दिविजा वृद्धाश्रम मध्ये ऍडमिशन घेतले. त्यांना एक नवीन कुटुंब मिळाले व ते आनंदाने सर्वांशी बोलून राहू लागले. शंकर सावंत आजोबांचे वयोमानानुसार दृष्टी कमी झाली होती म्हणून त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याचे शेट्ये यांनी ठरवले त्यानंतर विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्यामार्फत त्यांच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले त्यांना पुन्हा एकदा जग बघण्याची संधी मिळाली. पाच वर्ष ते आश्रमत आनंदाने हसत खेळत राहत होते. दिवसेंदिवस वाढयत्या वावोमाना मुळे थकत गेले व 19 ऑगस्ट रोजी त्याची सकाळी 6.30 वाजता प्राण ज्योत मावळली सर्वांनी मोठ्या अंतकरणाने आजोबांना निरोप दिला. अश्या आजिबाना मरावे परी कीर्ती रूपे उरावे. असा विचार करून संस्थेचे सचिव संदेश शेट्ये ह्यांनी देहादानाचा निर्णय घेतला व सर्व सरकारी नियमचे पालन करून शंकर आजोबांचे पार्थिव डॉक्टर विद्याधर तायशेट्ये व प्रमोद लिमयें सर ह्याच्या मदतीने त्यांचे नेत्र दान जिल्हा रुग्णालय ओरोस येथे करण्यात आले व देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग शरीरारचनाशास्त्र विभाग ओरोस येथे करण्यात आले. यासाठी फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॅाडी डोनेशन चे चिफ कोओरर्डिनेटर डॉ.विद्याधर तायशेटे , विभागीय कॉर्डिनेटर प्रमोद लिमयें तसेच सिव्हिल हॉस्पिटल चे Opthalmic Officer कौस्तुभ देशपांडे, डॉ प्राजक्ता थेटे यांनी सहकार्य केले. त्यांचा देहदान व नेत्रदान करण्याचा फॉर्म ऑगस्ट 2023 मध्ये भरला होता. ते गेली 5 वर्षे दिविजा आश्रम येथे राहत होते. तसेच त्यांचे कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे मृत्यू नंतर सर्व कार्यवाही दिविजा आश्रम यांचे व्यवस्थापक संदेश शेट्ये व त्यांचे कर्मचारी यांनी केली.

error: Content is protected !!