पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धेत उत्कृष्ट गायिका म्हणून सन्मान
आचरा (प्रतिनिधी) : कला अकादमी, गोवा आयोजित पंडित मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेत श्री शांतादुर्गा भजनी मंडळ, कारापूर, डिचोली येथील भजनी मंडळाची दुसरा अभंग गायिका कु. कोमल सुचिता संतोष चव्हाण हिने आपल्या दमदार गायनाने उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच कला अकादमी अंतिम फेरीत श्री शांतादुर्गा भजनी मंडळ, कारापूर, डिचोली यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.
स्पर्धेतील द्वितीय अभंग गायन प्रकारात कोमल चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकतेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तिला ‘उत्कृष्ट गायिका’ सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
कोमल चव्हाण ही गायना चे प्रशिक्षण रामचंद्र नाईक यांच्याकडे घेत असून, भजन कलेचे मार्गदर्शन आतिश कारापुरकर यांच्याकडून घेत आहे. तर भरतनाट्यम् मध्ये तीने भरतनाट्यम विशारद पदवी प्राप्त केली आहे. नृत्य आणि संगीत क्षेत्रातील तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीला या यशामुळे विशेष दाद मिळाली आहे. कोमल हि मुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे गावची रहिवासी असून सध्या गोवा येथे वास्तव्यास आहे.
कोमलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे कुटुंबीय, गुरुजन, श्री शांतादुर्गा भजनी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच कला-संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












