मोठ्या एलईडी स्क्रीनवर भाषण लाईव्ह दाखवणार
कणकवली (प्रतिनिधी) : उद्या शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत छात्र की गुंज हा महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि विशेषता विद्यार्थिनींच्या हक्क सुरक्षा समान संधी व शिक्षणाची संबंधित प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आवाज देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस आणि कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिक्षण प्रेमी नागरिकांना हा कार्यक्रम राहुल गांधींचे भाषण लाईव्ह कणकवलीतील पटवर्धन चौकात दाखविण्यात येणार आहे. पुण्यात होणाऱ्या छात्रोकी गुंज कार्यक्रमाला समर्थन देण्यासाठी कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस आणि कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेततरी सर्व कार्यकर्ते विद्यार्थी काँग्रेस प्रेमी आणि नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी केले आहे.
स्थळ आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली
दिनांक शनिवार 22 ऑगस्ट 2026
आयोजक सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस व कणकवली तालुका काँग्रेस.












