संयुक्त जयंती महोत्सव 2023 – प्रशिक विकास संघ वरवडे बौद्धवाडी

कणकवली (प्रतिनिधी): प्रशिक विकास संघ वरवडे बौद्धवाडी संलग्न भारतीय बौद्ध महासभा कणकवली यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव 2023 महामानव विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वराज्य निर्माते भारतीय राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव गुरुवार दिनांक 25 मे 2023 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 8:00 वाजता ध्वजारोहण सकाळी 8:30 वाजता सामुदायिक वंदना व पूजापाठ
सकाळी 9:00 भव्य मिरवणूक
दुपारी 3:00 ते5:00 आरोग्य शिबिर (डॉ. रूपाली वळंजु प्रा. आ. केंद्र वरवडे, डॉ. सोनाली वरवडेकर (वरवडे) )
सायंकाळी 7:00 ते 8:00 वाजता अभिवादन सभा
रात्रौ 8:00 ते 9:00 वाजता सत्कार समारंभ
रात्रौ 9:00 ते 10:00 वाजता स्नेहभोजन
रात्रौ 10:00 वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रम उद्घाटक म्हणून मिताली सावंत वरवडेकर (उपनगराध्यक्ष व महिला बालकल्याण सभापती देवगड नगरपंचायत) सभाध्यक्ष सिद्धार्थ सो. वरवडेकर (अध्यक्ष प्रशिक विकास संघ वरवडे बौद्धवाडी) कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती करुणा घाडीगावकर सरपंच ग्रा. वरवडे, अमोल बोंद्रे उपसरपंच ग्रा. वरवडे, विशाल कासले ग्रा. सदस्य, प्रदीप कदम ग्रा. सदस्य, सल्लाउद्दीन कुडाळकर, सोनू सावंत, सादिक कुडाळकर, सुभाष जाधव-अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, जनिकुमार कांबळे- सचिव भारतीय बौद्ध महासभा. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशिक विकास संघ वरवडे बौद्धवाडी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!