देवगड (प्रतिनिधी): G-20 अंतर्गत मिठमुंबरी येथे समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम व स्थानिक कलाकाराच्या माध्यमातुन समुद्र किनारी प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी के . मंजुलक्ष्मी , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दिनांक २१ मे संध्याकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे . जिल्हा परिषद सिधुदूर्ग , जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष , पंचायत समिती देवगड व ग्रामपंचायत मिठमुंबरी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक उपमुख्यकार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता विभाग ) विनायक ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत मिठमुबरी येथे संपन्न झाली यावेळी या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली असुन यामध्ये सायं .४ वा ते ४.३० वा ढोल वादन व मान्यवराचे स्वागत . सायं ४.३० ते ६ वा . समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम , सायं .६ ते ६ .१५ वा अल्पोपहार , सायं .६ .१५ ते ६ .३० वा वाळु शिल्प पाहणी , सायं ६ .३० ते ७ वाजता दांडी नृत्य , सायं .७ ते ७.३० वा स्वच्छता पोवाडा , सायं ७.३० ते ८ वाजता लमाणी नृत्य , रात्रौ ८ ते ८ .३० वा स्थानिक फुगडी नृत्य व समारोप अशा प्रकारचा कार्यक्रम मिठमुंबरी येथे होणार असुन या बैठकी वेळी सहाय्यक गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण , मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गांवकर , विस्तार अधिकारी ( ग्रामपंचायत ) निलेश जगताप , IEC तज्ञ प्रविण कानकेकर , ग्रामसेविका .रेश्मा गोवळकर , उपसरपंच गुरुनाथ गांवकर , ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंबरकर , ग्राप सदस्य अनिल गांवकर ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष सत्यवान गांवकर , हेमंत तोडणकर ,विनिता मुंबरकर , ग्रामस्थ उपस्थित होते . देवगड तालुक्यातील पर्यटनदृष्टया महत्वाच समुद्र किनारा म्हणून मिठमुंबरी बिचकडे पाहिले जात असुन या समुद्र किनारी पर्यटन दृष्टा अधिक विकास व्हावा यासाठी असे कार्यक्रम महत्वाचे असुन या समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमाला व तेथील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वानी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड करिश्मा नायर यांनी केल आहे .
मिठमुंबरी येथे समुद्र किनारा स्वच्छता व प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम










