माधवबाग च्या वतीने रक्तदाबाची अत्याधुनिक ए.बी.पी.एम तपासणी फक्त 699 रुपयांत
दीड हजारांची तपासणी केवळ 699 रुपयांत
कणकवली (प्रतिनिधी): माधवबाग च्या वतीने रक्तदाबाची अत्याधुनिक असलेली ए.बी.पी.एम तपासणी मोहीम 23 मे ते 28 मे दरम्यान कणकवली , कुडाळ, सावंतवाडी केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. दीड हजार खर्चाची ही तपासणी केवळ 699 रुपयांत माधवबाग च्या कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी केंद्रावर सकाळी 10 ते 11 : 30 वाजण्याच्या दरम्यान केली जाणार आहे. एका दिवशी फक्त एकच पेशंट तपासणी होणार आहे. ए.बी.पी.एम तपासणीमुळे 24 तासांच्या ब्लड प्रेशर ची सरासरी कळते. मानसिक ताण असल्याने ब्लड प्रेशर होण्याची शक्यता कळते. ब्लड प्रेशरचा त्रास सुरू असूनही निदान न झालेली अवस्था कळते. ब्लड प्रेशरच्या त्रासाने इतर अवयवांना परिणाम होण्याची स्थिती कळते.हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस होण्याची शक्यता कळते.या तपासणी साठी आगाऊ नावनोंदणी आवश्यक असून कणकवली मोबा. 9373183888 / कुडाळ मोबा. 9011328581 आणि सावंतवाडी मोबा. 7774028185 येथे संपर्क साधण्याचे आवाहन माधवबाग च्या वतीने करण्यात आले आहे.












