विद्यामंदिर कोळपे मराठी नं. १ येथे मोफत शालेय साहित्य व दप्तर वाटप संपन्न; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान

वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्यामंदिर कोळपे मराठी नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय दप्तर, वह्या, पेन आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले. दिलावर इसफ यांच्या माध्यमातून राजेश नवाळे यांनी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच ‘साई माऊली सेवा मंडळ’ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पेन वाटप करण्यात आले. या मदतीमुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक आधार मिळाला आहे.

याप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक भीमराव कांबळे म्हणाले, “शिक्षणासाठी केलेली ही मदत केवळ साहित्याची मदत नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले मोठे प्रोत्साहन आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. या सेवाभावी कार्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आत्मविश्वास हीच या कार्याची खरी पावती आहे.”

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी , ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्ष सुभाष माने, सचिव किशोर शिंदे, महेश फोंडके सुधाकर पाटणकर, सुरेश माने, दशरथ शिंदे, दिलीप माने. ॲड. विशाल जाधव, विलास माने, सुनील माने, मंगेश फोंडके, किशोर माने

तसेच माजी मुख्याध्यापिका कदम मॅडम, मुख्याध्यापक कांबळे सर, सहशिक्षिका पाटील मॅडम आणि अंगणवाडी सेविका फोंडके मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!