उद्योजक राहुल शेवाळे यांनी सपत्नीक केली पूजा; आज मान्यवरांच्या हस्ते प्रथम पूजा
देवगड (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तिसऱ्या श्रावण सोमवारी पुणे येथील उद्योजक राहुल शेवाळे यांनी सपत्नीक कुणकेश्वराची विधिवत पूजा-अभिषेक करून दर्शन घेतले. मंदिर परिसरात विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्रावण महिन्यातील सोमवारनिमित्त कुणकेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
आज सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवारनिमित्त प्रथम पूजेचा मान विविध मान्यवरांना देण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, पुणे येथील उद्योगपती राहुल शेवाळे, महाराष्ट्र मंडप डेकोरेटर्स असोसिएशन (कोल्हापूर) अध्यक्ष सागर चव्हाण, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, देवस्थानचे कायदेविषयक सल्लागार ऍड. प्रवीण कदम आणि कणकवलीचे उद्योजक ए. पी. सावंत यांचा समावेश आहे.
श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कुणकेश्वर मंदिरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समिती व प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.











