राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील आदर्श एज्यूकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कुल नडगिवे येथील विद्यार्थिनी कु.आलिया मोहसीन गिरकर (इयत्ता नववी) हिने लाख मराठा प्रतिष्ठान नाशिक… यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तिच्या या अभिनंदनीय यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
लाख मराठा प्रतिष्ठान नाशिक यांनी आयोजित केलेल्या नववी ते बारावी या दुसऱ्या गटात छत्रपती राजाराम महाराज या विषयावर कु.आलिया गिरकर हिने आपला निबंध सादर केला होता. या स्पर्धेत तिने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून सुद्धा मराठी विषयात मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. शाळेतील मराठी विषय शिक्षक ओंकार गाडगीळ यांचे तिला बहुमोल मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम डांगे संस्था अध्यक्ष रघुवीर राणे व सर्व संस्था पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी विशेष अभिनंदन करून पुढील उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.












