दिव्यांग बांधवांसाठी सावली जनसेवा शिक्षण संस्थेचा मदतीचा हात; मोफत छत्री वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे आणि गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधव व भगिनींसाठी सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी मोफत छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवांना पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संस्थेने हा उपक्रम आयोजित केला. यावेळी सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देसाई, उपाध्यक्ष संतोष उर्फ पप्पू पुजारे, कार्याध्यक्ष महेंद्र सावंत, दिव्यांग संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील सावंत, सचिव सचिन सादिये, मोहन परब, दीपक दळवी, आदेश कारेकर, यल्लाप्पा पटी मनी, प्रकाश वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होते. दिव्यांग बांधवांच्या गरजा ओळखून त्यांना आधार देणारे असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज आहे. सावली जनसेवा शिक्षण संस्था व गोपुरी आश्रम यांच्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला. मोफत छत्री मिळाल्याने उपस्थित दिव्यांग बांधवांनी सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे आभार मानत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

error: Content is protected !!