लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या सुरक्षित हाताळणीचे प्रात्यक्षिक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या सुरक्षित हाताळणी या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा सुरक्षित, शास्त्रीय व पर्यावरणपूरक वापर करण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

प्रात्यक्षिकामध्ये लक्ष्य किडीनुसार योग्य कीटकनाशकाची निवड, शिफारशीत मात्रेचा वापर, तसेच स्प्रेयरचे योग्य कॅलिब्रेशन करण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. फवारणी करताना हातमोजे, मास्क, गॉगल, पूर्ण बाह्यांचे कपडे व गमबूट यांसारख्या वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) वापर करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी शांत हवामानात फवारणी करणे, फवारणीदरम्यान खाणे-पिणे व धूम्रपान टाळणे, फवारणीनंतर शरीर व उपकरणे स्वच्छ धुणे आणि रिकाम्या कीटकनाशकाच्या डब्यांची सुरक्षित विल्हेवाट लावण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाचे मार्गदर्शन कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये वेदांत घाग, करण बन्ने, रीशल मस्केरेन्हस, प्रतिक चौधरी, सिद्धांत शिंदे, आर्यन सावळे, निखिल नागर, आदित्य प्रभुदेसाई, स्वयंभू प्रभुदेसाई,आशिम कुमार महंती व यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!