यशस्वी उद्योजकतेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजाच्या वतीने सत्कार

बांदा (प्रतिनिधी) : छोट्या व्यवसायातून आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करून आज यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची तसेच समाजाची ओळख उंचावणारे आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

बांदा मराठा समाज मंडळामध्ये उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना आनंद गवस यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, समाजाच्या विविध उपक्रमांना ते नेहमीच मोलाचा हातभार लावत आले आहेत. त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि उद्योजकीय यशाबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. हा सत्कार बांदा मराठा समाजाचे माजी सचिव म. गो. सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. आनंद गवस यांनी अत्यंत छोट्या व्यवसायातून आपल्या वाटचालीला सुरुवात केली. मेहनत, जिद्द आणि सातत्य, चिकाटिच्या जोरावर त्यांनी व्यवसायाचा विस्तार करत आज यशस्वी उद्योजक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या यशामुळे बांदा तसेच मराठा समाजाचे नाव उंचावले आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

या सत्कार सोहळ्यास बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत, माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत, उपाध्यक्ष विनोद सावळ, सल्लागार दीपक सावंत, मकरंद तोरसकर, ज्ञानेश्वर सावंत, शामसुंदर धुरी, रत्नाकर आगलावे, राजा सावंत, विकी कदम, दिनेश नाईक, संदेश महाले, विलास पावसकर, अशोक परब, स्वप्नील महाले, देवेश सावंत, भुषण सावंत, माजी खजिनदार राकेश परब यांच्या सह मराठा बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राकेश परब यांनी तर शेवटी आभार अध्यक्ष परिमल सावंत यांनी मानले.

error: Content is protected !!