कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग शाखा कणकवली च्या वतीने आज दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 12.00 वाजता कणकवली रेल्वे स्थानकामध्ये सीएसएमटी सावंतवाडी गाडी नंबर 150 87 या गाडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वे समन्वय समिती कणकवली कार्याध्यक्ष प्रा.हरिभाऊ भिसे कणकवली रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष सावंत ,नगरसेवक लूकेश कांबळे, समाजसेवक संजय मालंडकर, सुमित राणे, निलेश मोरे ,रामदास ठाकूर, दीपक माडगूत, बंटी सावंत ,आनंद कदम ,निलेश सावंत, आणि उमेश वाळके आणि प्रवासी उपस्थित होते कणकवली स्थानकात ही रेल्वे थांबत असल्याने त्याचा फायदा कणकवली मालवण देवगड विजयदुर्ग आणि परिसरातील अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे.
कणकवली रेल्वे स्थानकात सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत!












